26 September 2020

News Flash

मुंबईत सात मजली इमारतीला भीषण आग

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

मुंबईतल्या सात मजली इमारतीला आग लागली आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या इमारतीतून धूर येऊ लागल्याने या इमारतीत आग लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आले. काही लोक अडकले होते त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे.

मुंबईतील मस्जिद बंदर भागात असलेल्या इमारतीला आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आता ही आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही असंही अग्निशमन दलाने स्पष्ट केलं आहे. आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या २६ मिनिटांमध्ये त्यांनी आग नियंत्रणा आणली. ही आग कशी लागली हे समजू शकलेले नाही. मात्र आता ही आग पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 3:26 pm

Web Title: fire in seven storeyed commercial cum residential building in south mumbai scj 81
Next Stories
1 मुंबईकरांना काय मिळालं?; भाजपाचा शिवसेनेवर गंभीर आरोप
2 सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय तपासाला वेग, मुंबई पोलिसांकडून रेकॉर्ड घेतले; स्टाफ आणि स्वयंपाकीची चौकशी
3 मुंबईकरांची पाऊस’कोंडी’; बाप्पांच्या स्वागताच्या खरेदीला ब्रेक; हवामान विभागाकडून सर्तकेचा इशारा
Just Now!
X