News Flash

कळवा स्टेशनजवळ आग, मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु

ठाण्याच्याजवळ असलेल्या कळवा स्टेशनलगत आग लागल्याने मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. या ठिकाणी अग्निशमन दलाचा एक बंब दाखल झाला आहे. अंडरग्राऊंड केबलमधून ठिणग्या उडाल्या आणि ही आग लागली असंही समजतं आहे. ही आग लागल्यानंतर ट्रॅकजवळ असलेल्या कचऱ्यानेही पेट घेतला. या सगळ्यामुळे धीम्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.

धीम्या लोकलची वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आल्याने घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. एकामागोमाग एक ट्रेन उभ्या होत्या. अनेक प्रवाशांना सुरुवातीला काय घडलं? ते समजलेलं नाही. त्यानंतर आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसले. ज्यानंतर काय घडलं आहे त्याचा उलगडा अनेकांना झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 5:34 pm

Web Title: fire near kalwa station the local train service has come to a halt for some time scj 81
Next Stories
1 एसी लोकलमुळे ठाण्यात प्रवाशांचा गोंधळ
2 केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई – सुप्रिया सुळे
3 औषधांचा काळाबाजार?
Just Now!
X