19 January 2020

News Flash

रुग्णालये, प्रसूतिगृहे, आरोग्य केंद्रांची अग्निसुरक्षा तपासणी युद्धपातळीवर

महापालिकेचे अग्निशमन दलाला आदेश

|| प्रसाद रावकर

महापालिकेचे अग्निशमन दलाला आदेश

मुंबईतील बहुमजली इमारतींबरोबरच आता पालिका रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने आपली लहान-मोठी रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने, आरोग्य केंद्रांच्या तपासणीचे फर्मान अग्निशमन दलाला सोडले आहे. अग्निशमन दलानेही तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

मोठी रुग्णालये वगळता लहान रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमधील सुरक्षा व्यवस्था आणि अग्निसुरक्षा वाऱ्यावरच आहे. त्यामुळे तेथे येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत एकदाही प्रसूतिगृहे, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये अग्निसुरक्षाविषयक तपासणी केलेली नाही. आगीच्या दुर्घटना वाढत असल्यामुळे छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयांबरोबरच प्रसूतिगृहे, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अग्निशमन दलाला ५७ छोटय़ा-मोठय़ा रुग्णालयांबरोबरच २८ प्रसूतिगृहे, १७५ दवाखाने आणि २०८ आरोग्य केंद्रांची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने केवळ आदेशच दिले नाहीत, तर रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांची यादीच अग्निशमन दलाकडे दिली. अग्निशमन दलानेही तपासणीचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे.

रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालय, प्रसूतिगृहे, दवाखाने, आरोग्य केंद्रातील येण्या-जाण्याचे मार्ग, दुर्घटना घडल्यास इमारतीतून बाहेर पडावयाचा मार्ग, अग्निशमनासाठी आवश्यक यंत्रणा, उपकरणांची आवश्यकता याचा आढावा घेण्यात येणार आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने आणि आरोग्य केंद्रांच्या तपासणीचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.   – प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी

First Published on May 20, 2019 12:33 am

Web Title: fire safety inspection in mumbai
Next Stories
1 स्वाइन फ्लूची लस घेण्याबाबत डॉक्टरच उदासीन
2 अकरावी, बारावीत आता स्पॅनिश, चिनी भाषेचा पर्याय
3 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूककोंडी
Just Now!
X