News Flash

सर्वच रुग्णालयांतील अग्निसुरक्षा तपासणीचे आदेश

तपासणी दरम्यान अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत

गेल्या काही दिवसांत आगीच्या दुर्घटनांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन मुंबईतील सरकारी, पालिका आणि खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी प्रमुख अग्शिशमन अधिकाऱ्यांना दिले.

तपासणी दरम्यान अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना अहवाल १५ दिवसात सादर करावा  लागेल.

भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील रुग्णालयापाठोपाठ दहिसरमधील जम्बो करोना केंद्रात लागलेल्या आगीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी सोमवारी वरील आदेश दिले. मुंबईतील सरकारी, पालिका आणि खासगी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करुन त्याचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करण्याचे निर्देश प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अग्निसुरक्षा यंत्रणेत त्रुटी आढळणाऱ्या रुग्णालयाविरोधात ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय कायदा २००६’अंतर्गत कारवाई करावी, असेही या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णालयांतील अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी आणि कारवाईबाबतचा अहवाल १५ दिवसांमध्ये सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:39 am

Web Title: fire safety inspection orders in all hospitals abn 97
Next Stories
1 कठोर निर्बंधांवर नाराजी
2 धारावीत लसीकरण संथगतीने
3 टाळेबंदीच्या नेमक्या नियमावलीबाबत व्यापारी अनभिज्ञ
Just Now!
X