23 September 2020

News Flash

अंधेरीतील कामगार रुग्णालयात पुन्हा आग, तीन दिवसातील दुसरी घटना

सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील मीटर बॉक्सला आग लागली.

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा तिथेच आज (बुधवार) दुसऱ्यांदा आग लागली आहे.

मुंबईतील अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पुन्हा तिथेच आज (बुधवार) दुसऱ्यांदा आग लागली. सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील मीटर बॉक्सला ही आग लागल्याचे सांगण्यात येते. अग्निशामक दलाचे ३ बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. दरम्यान, सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. यात ९ जणांचा बळी गेला होता.

या आगीप्रकरणी एसीचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून यांची चौकशी केले जात असल्याचे सांगण्यात येते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत सोमवारी आग आटोक्यात आणली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. आग लागल्यानंतर धूर कोंडला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आठ जणांचा मृत्यू झाला होता. आज आणखी एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊ झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 8:28 pm

Web Title: fire takes place again at kamgar hospital premises in andheri mumbai
Next Stories
1 Mumbai Hospital Fire: जिवावर उदार होऊन या डिलेव्हरी बॉयने वाचवले १० जणांचे प्राण
2 Rafale Deal : चोरोंको सब नजर आते है चोर – आशिष शेलार 
3 धाकड है ! १५ वर्षांच्या अंध मुलीने छेड काढणाऱ्याला शिकवली जन्माची अद्दल
Just Now!
X