नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातच शिक्षकांच्या आंदोलनाने

राज्याच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातच आंदोलनाने होणार असून पहिल्याच दिवशी शंभर टक्के अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदान गाठणार असल्यामुळे शाळा भरणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
mumbai crime news, woman suicide mumbai marathi news
मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल
mumbai 8 year old girl rape marathi news
मुंबई : आठ वर्षांच्या मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार, आरोपी शिपायाला अटक

नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात प्रवेशोत्सवाने केली जाते. विद्यार्थ्यांना खाऊ, शालेय साहित्याचे वाटप, त्यांचे जंगी स्वागत शाळांमध्ये होते. यंदा मात्र पहिल्याच दिवशी शाळा भरणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांना शंभर टक्के अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी शिक्षक आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्य कायम विनाअनुदानित-अनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवारपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

गेल्या १९ वर्षांपासून विनाअनुदानित शाळेतील शिक्षक अनुदानाची मागणी करत आहेत. शासनाने काही शाळांचे मूल्यांकन करून त्यांना २० टक्के अनुदान दिले. मात्र एकाही शाळेला शंभर टक्के अनुदान मिळाले नाही. पुरेसे अर्थसाहाय्य नसल्यामुळे राज्यातील साधारण साडेपाच हजार शाळा येत्या काळात बंद होतील. यातील ८० टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

शासनाचे मराठी प्रेम बेगडी आहे. कोणतेही अधिवेशन असो शिक्षकांना सतत आंदोलने करावी लागतात. अनुदानाच्या प्रश्नावर कृती समितीने नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. मात्र त्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन करावे लागत आहे.   – प्रशांत रेडीज, अध्यक्ष, कृती समिती