20 November 2019

News Flash

मासेमारी दोन महिन्यांसाठी बंद

मुंबई शहर मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाने मुंबईतील सर्व मच्छीमार संघटनांना लेखी आदेश दिले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मासळीच्या साठय़ाचे जतन तसेच मच्छीमारांचे संरक्षण यादृष्टीने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या काळात राज्याच्या सागरी क्षेत्रात यांत्रिक नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

मुंबई शहर मत्स्यव्यवसाय आयुक्तालयाने मुंबईतील सर्व मच्छीमार संघटनांना लेखी आदेश दिले आहेत. दोन महिन्यांच्या काळात मासेमारीस यांत्रिक नौकांना पूर्ण बंदी करण्यात आली आहे. १ जूनपूर्वी समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या यांत्रिक नौकांना कोणत्याही परिस्थितीत १ जूनपूर्वीच बंदरात परतावे लागणार आहे.

कोणत्याही यांत्रिक नौकेस १ जूनपासून मासे बंदरात उतरवता येणार नाही. मासे उतरवण्याबाबत बंदीचा भंग होणार नाही यासाठी नवीन भाऊचा धक्का आणि ससून डॉक येथील अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. बहुतांश मच्छीमारांकडून पारंपरिकपणे या काळात आपणहून मासेमारी बंदी पाळली जाते. काही मच्छीमार संघटनांच्या मते ही बंदी तारखेनुसार लागू न करता नारळी पोर्णिमेपर्यंत म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत असावी.

First Published on May 23, 2019 12:57 am

Web Title: fishing closed for two months
Just Now!
X