11 December 2017

News Flash

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच जण ठार

सात जण गंभीर जखमी

मुंबई | Updated: October 13, 2017 1:00 PM

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळील पार्ले येथे ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला.

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळील पार्ले येथे ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. भरधाव असणाऱ्या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मुझफ्फर येलूकर, नीलम अंबाजी कांबळे, नमीबाई जाधव, सोहम सचिन जाधव यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला. तर दशरथ सुतार, देवांश चाळके, अनिता गणपत पवार, इंदू तळेकर, गीता चाळके, रुद्र चव्हाण आणि संतोष कोळेकर जखमी झाले आहेत.

First Published on October 13, 2017 12:57 pm

Web Title: five died in an accident on mumbai goa highway