मुंबई : केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने दोन कारवायांमध्ये तीन नायजेरीयन नागरिकांसह पाच जणांना अटक केली. एनसीबीने त्यांच्याजवळून ११३ ग्रॅम एमडी आणि १३ ग्रॅम कोकेन हे अमली पदार्थ जप्त केले. कारवाईत एनसीबीने आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटमधील एका मुख्य आरोपीला अटक केली.

एनसीबीने हाजी अली परिसरात छापा मारून शनिवारी अजय राजू सिंग या तस्कराला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अरमान कोहलीचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीने त्याला अटक केली होती. दरम्यान अरमान कोहलीकडून हस्तगत केलेले अमली पदार्थ दक्षिण अमेरिकेतून तस्करी करून आणल्याचे समोर आल्यानंतर यात आंतरराष्ट्रीय टोळी सहभागी असल्याचे समोर आले होते. त्यानुसार एनसीबीने रविवारी आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करून एमडी या अमली पदार्थासह मोहम्मद अजय सय्यद याला जुहू गल्ली येथून अटक केली. त्याच्या चौकशीतून नायजेरियन नागरिक असलेल्या उबा विझ्डोम याचे नाव समोर आल्यानंतर एनसीबीने छापा मारून त्याला अटक केली. अमली पदार्थ पुरवठा साखळीत मुख्य तस्कर असलेल्या एनवाचियासो  याला एनसीबीने आरे वसाहतीतून अटक केली. यावेळी त्याने एनसीबीच्या पथकावर हल्ला केला. घटनेत एनसीबीचे एक अधिकारी जखमी झाले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान एनवाचियासो हा गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला आहे. आफ्रिकन नागरिकांचे अमली पदार्थ रॅकेट तो चालवित होता, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

अन्य एका कारवाईत नालासोपाऱ्यातून एनसीबीने एका नायजेरियन व्यक्तीला एमडीसह अटक केली. संडे ओकेकी असे त्याचे नाव आहे. तो अभिनेता असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

१०० ग्रॅम कोकेन जप्त

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने चिता कॅ म्प ट्रॉम्बे येथून अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका ओला चालकासह अन्य एकाला अटक के ली. पोलिसांनी त्याच्याजवळून ३० लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम कोके न जप्त के ले. संजय रमाकांत चतुर्वेदी असे या ओला चालकाचे नाव आहे. तर फे लीक्स इमांगवेल असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. संजय हा आफ्रिकन वंशाच्या तस्कराकडून दोन ते तीन दिवसातून २० ते ३० ग्रॅम कोके न हा अमली पदार्थ विकत घेत होता. या अंमली पदार्थाची  दक्षिण मुंबईतील ग्राहकांना विक्री करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.