News Flash

कोटामध्ये दडवलेले पाच किलो सोने जप्त

दुबईहून मुंबईत तस्करीसाठी आणलेले तब्बल दिड कोटी रुपयांचे पाच किलो सोने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच पकडण्यात आले असून फराह अली या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

| February 3, 2013 02:45 am

दुबईहून मुंबईत तस्करीसाठी आणलेले तब्बल दिड कोटी रुपयांचे पाच किलो सोने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरच पकडण्यात आले असून फराह अली या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. फराह अली याने हे सोने आपल्या अंगावरील कोटामध्ये दडवून आणले होते. शनिवारी पहाटे अडीच वाजता दुबईहून आलेल्या विमानातील प्रवासी फराह अली (४२) हा आपल्या सामानाची नोंद न करताच  बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या अंगावरील कोट जड असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्याला थांबवून त्याची तपासणी केली असता त्याच्या कोटाला आतील बाजूस नऊ खिसे असल्याचे लक्षात आले. त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये सोन्याची बिस्किटे असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. हे सोने तस्करीसाठी आणण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 2:45 am

Web Title: five kilogram gold ceased
टॅग : Gold,Smuggling
Next Stories
1 अपघात टाळण्यासाठी आता ‘ई-सव्‍‌र्हिलन्स’राबविण्याचा विचार
2 अपघात कसे टळणार?
3 एक कोटीचा ‘ऑनलाइन’ गंडा घालणाऱ्यास वसईत अटक
Just Now!
X