News Flash

मुंबईत दोन वर्षांत पाच हजार वाहनांची चोरी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीची असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईतून गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्य़ांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ गाडी चोरीची असल्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अनेक गंभीर गुन्ह्य़ांमध्ये चोरीच्या गाडीचा वापर करण्यात आला आहे.

मुंबईतून दोन वर्षांत जवळपास पाच हजार ४९४ वाहने चोरीला गेली. त्यापैकी दोन हजार वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित वाहनांचा शोध अद्याप लागलेला नाही. गुन्हा करण्याबरोबरच, गुन्हा केल्यानंतर पलायनासाठी, अतिरेकी कारवायांमध्ये स्फोटके, शस्त्र वाहून नेण्यासाठी, स्फोटके पेरण्यासाठी या वाहनांचा वापर करण्यात आला.

अतिरेकी हल्ल्यांत वापर

अतिरेकी संघटनांनी घडवून आणलेल्या हल्ल्यात, विशेषत: एकल आत्मघातकी हल्ल्यांत (लोन वूल्फ अ‍ॅटॅक) चोरीची वाहने उपयोगात आणण्यात आली.  इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेने २००८मध्ये गुजरातच्या अहमदाबाद, सुरत शहरांमध्ये  २१ बॉम्ब (इंप्रोव्हाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) पेरले होते. यापैकी बहुतांश बॉम्ब व्ॉगन आर आणि तत्सम मोटरगाडय़ांमध्ये ठेवून त्या रुग्णालयांबाहेर उभ्या करण्यात आल्या होत्या. यातील चार व्ॉगन आर गाडय़ा नवी मुंबईतून चोरी करण्यात आल्या होत्या. तत्कालीन एटीएस पथकाने या गाडय़ा चोरणाऱ्या मोहम्मद मोईन अब्दुल शकुर खान ऊर्फ इरफान आणि अयुब राजा अमीन शेख या दोन चोरांना अटक केली.

विशेष पथक बरखास्त

शहरात वाहनचोरी वाढत असल्यामुळे गुन्हे शाखेने मोटार वाहनचोरीविरोधी पथक स्थापन केले होते. आता ते बरखास्त करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:01 am

Web Title: five thousand vehicles stolen in mumbai in two years abn 97
Next Stories
1 अमर महल ते ट्रॉम्बेपर्यंत जलबोगदा
2 महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिलादिनी कार्यान्वित
3 मुंबईत ११८८ नवे रुग्ण
Just Now!
X