लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी पाच वर्षांचा एक मुलगा पाण्यात पडला. सैयेश मर्दे असं या मुलाचं नाव आहे. पाम्यात बुडणाऱ्या इतरांना वाचवून नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सैयेश कुठे गेला याचा पत्ता लागलेला नाही. सैयेशचे कुटुंबीय सोमवारपासून शोध घेत आहेत. आईच्या हातातून मुलाला कोणीतरी हिसकावून घेतले पण त्याला कुठे नेण्यात आले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

सैयेश मर्देचा शोध सुरु आहे. विसर्जनासाठी जाणाऱ्या ताफ्यातली बोट समुद्रात बुडाली. बोटीतल्या पाचही जणांना वाचवण्यात यश आलं. काजल मेयर, अवनी, निलेश भोईर, अदनान खान, अनिता हे भाविक राजाच्या विसर्जनासाठी चालले होते त्यावेळी त्यांची बोट बुडाली या बोटीत सैयेश मर्देही होता. वजन वाढल्यामुळे बोट बुडाल्याची माहिती समोर आली होती. बोटीतमधले पाचजण समुद्रात पडल्यानंतर जीवन रक्षकांनी समुद्रात उड्या घेत या लोकांना वाचवलं होतं. आता सैयेश मर्देचा शोध लागलेला नाही, त्याचा शोध घेणे सुरु आहे.