पाच वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका महिलेला भायखळा पोलिसांनी सोमवारी अटक केली. भायखळा येथील ज्या शाळेत ही बालिका शिकते, त्याच शाळेत अटक करण्यात आलेली महिला आया (वय -५८) म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात येते. त्या महिलेने बालिकेवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार केला होता. प्रायव्हेट पार्टमध्ये जखम झाल्याचं समजल्यावर चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्रजी माध्यमात शिकणा-या या चिमुकलीच्या पोटात आणि पोटाखालील भागात काही दिवसांपासून दुखत होतं. त्यामुळे ती शाळेत जाण्यास घाबरत होती. तिच्या कुटुंबियांनी नेहमीच्या डॉक्टरांकडे वैद्यकिय तपासणी केली. त्यानंतर मुलीच्या गुप्तांगात जखम झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही बाब त्या मुलींच्या पालकांना समजल्यानंतर त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे त्या महिलेच्या विरोधात तक्रार केली. व्यवस्थापनाने त्या महिलेला कामावरून काढून टाकले आणि मुलीच्या पालकांसोबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यासही पुढाकार घेतला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five year old girl molested by 58 years school mausi in mumbai
First published on: 24-04-2018 at 06:54 IST