पोलिसांना गुंगारा देत ‘मोक्का’ न्यायालयातून पलायन केल्याप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अफझल उस्मानी याला महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सप्टेंबर २०१३ मध्ये सुनावणीसाठी उस्मानीला ‘मोक्का’ न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र पोलिसांना गुंगारा देत त्याने न्यायालयाच्या परिसरातून पलायन केले होते.

बॉम्बस्फोट घडवल्यानंतर त्याबाबतचे ई-मेल्स पाठवण्याची जबाबदारी उस्मानीवर होती. याच आरोपांतर्गत त्याला अटक करण्यात आली होती.