दरवर्षीपेक्षा आवक कमी, व्यवसाय मात्र समाधानकारक

मुंबई : राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे दस ऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात फुलांची आवक होईल का याबाबत साशंकता होती. परंतु मागील आठवड्यात ब ऱ्याच ठिकाणी पाऊस आटोक्यात आल्याने दस ऱ्याच्या दोन दिवस अधिक जवळपास ६० टक्के  फु लांची मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत आवक झाली आहे. शिवाय ग्राहकांचीही रेलचेल वाढल्याने व्यवसायाची परिस्थिती समाधानकारक असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात फुलांना विशेष फटका बसला. घटस्थापनेला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनीही ओला झेंडू मुंबईकडे पाठवला, परंतु ग्राहकांनी पाठ फिरवल्याने हजारो किलो झेंडू व्यापाऱ्यांनी फेकून दिला. दस ऱ्यालाही असेच चित्र असेल, याची भीती व्यापाऱ्यांना होती. परंतु याच्या अगदी उलट परिस्थिती सध्या फूल बाजारात आहे.

दस ऱ्याला दोन दिवस बाकी असतानाच दादर येथील घाऊक आणि किरकोळ दोन्ही बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या. शिवाय उत्तम प्रतीचा कोरडा झेंडू बाजारात आल्याने फुलांचा भावही दुपटीने वधारला. २२ ऑक्टोबरला व्यापाऱ्यांनी ४० ते ५० रुपये प्रती किलोने झेंडू विकला होता. त्याच झेंडूला शुक्रवारी १०० ते १२० रुपये प्रति किलो भाव मिळाला. चांगल्या प्रतीचा झेंडू बाजारात आला, ग्राहक संख्या वाढली तर हा भाव अजून काही रुपयांनी वाढेल, अशी शक्यता या वेळी व्यापाऱ्यांनी वर्तवली. ‘राज्यात ब ऱ्याच ठिकाणी अजूनही पाऊस आहे. त्यामुळे काही फु ले ओली तर काही कोरडी अशा स्वरूपात येत आहे. दरवर्षीच्या तुलनेने यंदा केवळ ६० टक्के  फु ले बाजारात आली आहेत.

महाराष्ट्रातील फु ले मोठ्या प्रमाणावर दस ऱ्यानिमित्त राज्याबाहेरही पाठविण्यात येतात. त्यामुळे फुलांची मागणी आणि भाव वाढणे स्वाभाविक आहे. दस ऱ्याला दोन दिवस असतानाच ग्राहकांची रीघ वाढली आहे. असाच प्रतिसाद मिळाला तर मोठ्या प्रमाणात फुलांची गरज भासेल,’ असे फुलांचे घाऊक विक्रेते संजय जाधव यांनी सांगितले.    सध्या प्रवासातील मुभा वाढल्याने किरकोळ बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी दिसून आली. ६० ते ८० रुपये मीटर या दराने फुलांचे आयते तोरण विकले जात होते. फुलांसोबतच भाताचे तुरे, आंब्याचा डहाळ अशा वस्तूंना मोठा प्रतिसाद असल्याचे दिसले.

पावसामुळे फुलांची आवक कमी झाली. शिवाय दसरा हा सण ग्रामीण भागातही तितक्याच उत्साहाने केला जात असल्याने ब ऱ्याच शेतकऱ्यांचा माल जागेवरच विकला गेला. परिणामी फुलांचे भाव वाढले.  तरी ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येत आहे.

– राजेंद्र हिंगणे, कार्याध्यक्ष,  मीनाताई ठाकरे फूल मंडई.