03 June 2020

News Flash

मंत्रिपदासाठी आठवलेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

केंद्रात मंत्रिपद मिळावे, यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

| August 5, 2015 12:33 pm

केंद्रात मंत्रिपद मिळावे, यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शब्द टाकण्याचे आठवले यांना आश्वासन दिले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-रिपब्लिकन पक्ष युतीचा लेखी करार झाला होता. त्यात भाजपने आठवले यांना केंद्रात मंत्रीपद तसेच राज्यातही पक्षाला दोन मंत्रीपदे, विधान परिषदेची आमदारकी, शासकीय मंडळे, महामंडळे व समित्यांवर योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्यातील काहीही पक्षाला मिळालेले नाही. त्यामुळे आठवले आणि त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत. आठवले यांनी राज्यात मंत्रिपद स्वीकारावे, असा अनेकवेळा त्यांच्यासमोर भाजपने प्रस्ताव ठेवला होता. परंतु त्यांना केंद्रातच मंत्रीपद हवे आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2015 12:33 pm

Web Title: for minister post athwale requesting to minister
टॅग Ramdas Athavale,Rpi
Next Stories
1 खारफुटीतील कचरा त्वरित उचला
2 जान्हवी गडकरला जामीन मंजूर
3 ‘राष्ट्रहितासाठी हिंसा समर्थनीय’
Just Now!
X