|| सुशांत मोरे

राज्य परिवहन प्राधिकरणाकडून प्रस्तावित; राज्यातील उर्वरित भागांतही टप्प्याटप्प्याने लागू

मुंबई : कालबाह्य झालेल्या रिक्षांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सध्या मुंबई महानगरात १६ वर्षे असलेली कालमर्यादा कमी करून १५ वर्षे करण्याचे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. ही मर्यादा मुंबई महानगरासाठी प्रस्तावित करतानाच राज्यातील उर्वरित प्राधिकरणांतही प्रत्येक वर्षी टप्प्याटप्यात कालमर्यादा लागू करण्याचा विचार आहे.

मुंबई महानगरात १६ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रिक्षा भंगारात काढण्याचा नियम आहे. राज्याच्या उर्वरित भागांत काही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांनीही हेच आयुर्मान ठेवले आहे. अन्यत्र हा नियम नाही. त्यामुळे मुंबई महानगर सोडता अन्य भागांत रिक्षांसाठी कालमर्यादा नाही. त्यामुळे कालबाह््य झालेल्या जुन्या रिक्षा रस्त्यावर धावण्याचे प्रमाण मुंबईपेक्षा अन्य भागांत अधिक आहे. त्यामुळे अपघात होऊन प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण होतो. नवीन रिक्षा घेण्यापेक्षा जुनीच रिक्षा चालवून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न अनेक चालक-मालक करतात. या रिक्षा रस्त्यावर धावल्यास वाहतूक पोलीस किं वा आरटीओकडून कारवाईही

के ली जाते, पण ही कारवाई वरवरची असते. सध्या मुंबई महानगरात रिक्षांसाठी आयुर्मान १५ वर्षे करण्याचे राज्य परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रस्तावित करण्यात आले आहे. खटुआ समितीने रिक्षांचे आयुर्मान १५ वर्षे करण्याचे सूचित केले होते, परंतु अनेक कारणांमुळे ते लागू झाले नाही. २०२० मध्ये ते लागू के ले जाणार होते. परंतु करोनामुळे हा प्रस्ताव मागे पडला. नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत १५ वर्षांची कालमर्यादा करण्याचे प्रस्तावित करताना १ ऑगस्ट २०२१ पासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

पुढील वर्षापासून अंमलबजावणी

सध्या करोनामुळे रिक्षाचालक संकटात असून त्यामुळे याची अंमलबजावणी पुढील वर्षापासूनच के ली जाणार आहे, तर उर्वरित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणात २० वर्षे, १८ वर्षे, १६ वर्षे आणि १५ वर्षे अशी कालमर्यादा पुढच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक वर्षी टप्प्याटप्यात लागू के ली जाणार आहे.