27 May 2020

News Flash

विलगीकरणासाठी झोपु, म्हाडा प्राधिकरणाकडून २६०० घरे

दोन्ही यंत्रणांनी तूर्तास २६०० घरे उपलब्ध करून दिली आहेत

संग्रहित छायाचित्र

करोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर विलगीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात सदनिकांची गरज लक्षात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण तसेच म्हाडाकडे मागणी करण्यात आली आहे. या नुसार या दोन्ही यंत्रणांनी तूर्तास २६०० घरे उपलब्ध करून दिली आहेत. गरज भासल्यास ही घरे जिल्हाधिकाऱ्यांकडून ताब्यात घेतली जाणार आहेत.

उपनगरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर विलगीकरणासाठी आवश्यक खाटा इस्पितळांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात अलीकडेच महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केला होता. या आदेशानुसार रिक्त असलेल्या सदनिका विलगीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात याव्यात. या सदनिकांना निवासयोग्य प्रमाणपत्र मिळालेले नसले तरी अशा सदनिका ताब्यात घेऊन तेथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसरात रिक्त असलेल्या व विकल्या न गेलेल्या दोन लाख दहा हजार सदनिका आहेत. त्यापैकी ६० टक्के सदनिका मुंबईत आहेत. या सर्व सदनिका प्रामुख्याने खासगी विकासकांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याशीही उपनगर जिल्हाधिकारी चर्चा करीत आहेत. यापैकी काही विकासकांनी सदनिका देण्याची तयारी दाखविली आहे तर काहींनी अर्धवट अवस्थेत बांधकामे असल्यामुळे  सदनिका देण्यात अडचण असल्याचे सांगितले आहे.

मुलुंड येथील तांबेनगर जवळील आशीर्वाद आणि सिद्धार्थनगर झोपु योजनेतील ४४६ पुनर्वसन सदनिकाही यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चेंबूरच्या सिद्धार्थ वसाहतीत ३२० तर जोगेश्वरी पूर्वेतील नव्याने बांधलेल्या प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या २७७ सदनिकाही विलगीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी प्राधिकरणाने दाखविली आहे. पवई येथील संघर्ष नगर (२४९), घाटकोपर पष्टिद्धr(१५५)म  आझाद नगर (१९९), विनोबा भावे नगर, कुर्ला (१५०), टँक रोड, मालाड पष्टिद्धr(१५५)म (१२३), कार्टर रोड क्रं. नऊ, बोरिवली पूर्व (६५), कांदरपाम्डा, दहिसर पष्टिद्धr(१५५)म (३०) अशा ठिकाणी असलेल्या सदनिकांची यादी प्राधिकरणाने पाठविली आहे.

म्हाडाने मानखूर्द येथील पीएमजीपी वसाहतीतील २६५ सदनिका विलगीकरणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय चारकोपमध्ये १७० तर कांदिवलीच्या महावीर नगरात १९० सदनिकांची यादी म्हाडाने सादर केली आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून विलगीकरणासाठी आणखी सदनिकांची आवश्यकता आहे. खासगी विकासकांशी बोलून त्यांची घरेही ताब्यात घेण्यात येणार असल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

सरकारी पातळीवर प्रयत्न

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने १९७३ तर म्हाडाने ६२५ सदनिका विलगीकरणासाठी देऊ केल्या आहेत. ओम साई, सहार रोड, अंधेरी पूर्व येथील ११४ पुनर्वसन सदनिका  ताब्यात दिल्या आहेत.आशीर्वाद आणि सिद्धार्थनगर झोपु योजनेतील ४४६ पुनर्वसन सदनिकाही उपलब्ध करून देण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:53 am

Web Title: for separation 2600 houses from mhada authority abn 97
Next Stories
1 मुंबईत ५७ नवे रुग्ण
2 ८६ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत
3 वीजदरांवरून तज्ज्ञांचे टीकास्त्र, तर भाजप श्रेयासाठी सरसावला
Just Now!
X