प्रतिसाद दिलेल्या नऊ पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी सुरू

मुंबई : मुंबईकरांना करोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी पालिके ने जागतिक स्तरावरील पुरवठादारांकडून मागवलेल्या स्वारस्य पत्राच्या मुदतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत दहा पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी एका पुरवठादाराने आधीच माघार घेतली असून नऊ संभाव्य पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी येत्या दोन तीन दिवसात के ली जाणार आहे. दरम्यान, संपूर्ण प्रक्रिया पार पडून जून अखेपर्यंत लस मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिका करोना प्रतिबंधात्मक लशीच्या एक कोटी मात्रा विकत घेण्याचे नियोजन के ले असून त्याकरिता जागतिक स्तरावरून पुरवठादारांकडून स्वारस्यपत्र सादर करण्याच्या कालावधीला यापूवी १८ मे व नंतर २५ मे रोजी अशी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.  दुसऱ्यांदा दिलेली मुदतवाढ मंगळवारी (१ जून) संपली असून आता प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी पालिका प्रशासनाने सुरू के ली आहे. येत्या दोन तीन दिवसात कागदपत्रांची छाननी करून मग त्यातून पुरवठादार नक्की के ल्यानंतर स्थायी समितीची मंजुरी घेऊन मग कार्यादेश दिला जाईल. कार्यादेश दिल्यानंतर पुरवठादाराला तीन आठवडय़ाची मुदत देण्यात येईल. त्यामुळे सगळी प्रक्रिया व्यवस्थित पार पडली तर जून अखेपर्यंत आपल्याला लस मिळू शके ल, अशी माहिती उप आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. तर ही संपूर्ण प्रक्रिया दोन देशांमधील असल्यामुळे कागदपत्रांची छाननी व पडताळणी हा यातील सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचे उपआयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले.

लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार व प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या याच्यातील व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अवश्यक आहे. जेणेकरून लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल, याची खात्री पटेल. किती दिवसात, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लशीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करून महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सतत पाठपुरावा करीत आहे.

उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार तसेच उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी लस पुरवठा उपलब्ध करून घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत.

स्पुटनिकसाठी सात पुरवठादार

स्वारस्य दाखवलेल्या ९ पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी ‘स्पुटनिक फाइव्ह’ या लशीचा पुरवठा करण्याची तयारी दाखविली आहे तर त्यातीलच एका पुरवठादाराने ‘स्पुटनिक लाईट’ या लसीचा देखील पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल त्या लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे.