News Flash

आरेकडून वन विभागाला ८१२ एकर जागेचा ताबा

बोरिवली तहसीलदार आणि मालाडचे नगर भूमापन अधिकारी यांच्या उपस्थितीत जागेचा ताबा घेण्यात आला. 

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’जवळील आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या २८६.७३२ हेक्टर जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीकडून सोमवारी वन विभागास मिळाला. त्यामुळे मुंबईसारख्या महानगराच्या मध्यभागी विस्तीर्ण जंगल उभे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बोरिवली तहसीलदार आणि मालाडचे नगर भूमापन अधिकारी यांच्या उपस्थितीत जागेचा ताबा घेण्यात आला.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकासमंत्री सुनील केदार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता.

आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता ८१२ एकर जागेवर जंगल वसवता येणार आहे.

राखीव वन क्षेत्राबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येऊन त्यावर सुनावणीनंतर अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे. राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय, इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. खूप दिवसांनी आरेबाबत चांगली बातमी ऐकायला मिळाली असून आरेचे संपूर्ण जंगल वाचवण्यासाठी ‘आरे वाचवा चळवळ’ सुरूच राहणार असल्याचे पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी सांगितले.

जंगल वसणार..

आरे येथील १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव येथील ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील ८९.६७९ हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यामुळे आता ८१२ एकर जागेवर जंगल वसवता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:35 am

Web Title: forest department gets possession of 812 acres of aarey land zws 70
Next Stories
1 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची एक हजार पेट्रोल पंपांवर निदर्शने
2 निर्बंध हटताच बाजारात चैतन्य!
3 रेल्वे स्थानकांत गर्दी, गोंधळ
Just Now!
X