News Flash

काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे निधन

वर्षभरापासून ते कर्करोगाशी लढा देत होते

काँग्रेसचे माजी नेते आणि राजकीय निरीक्षक अजित सावंत यांचं निधन झालं आहे. वर्षभरापासून त्यांना कर्करोगाने ग्रासलं होतं. मुंबईत त्यांचं निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. डॉ. अजित सावंत यांनी काँग्रेसमध्ये बराच काळ घालवल्यानंतर आणि महत्त्वाची पदं भुषवल्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेर पडले होते. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर ते आप या पक्षात गेले होते. कामगारांचे हक्क आणि कामगार कायद्यांबाबत त्यांचा अभ्यास होता. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी सर्वात आधी संघटना उभारली. आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 9:44 pm

Web Title: former congress leader ajit sawant passed away
Next Stories
1 तृतीयपंथीय समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
2 मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोदी सरकारचे गिफ्ट, ‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
3 समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
Just Now!
X