देशमुखांचा न्यायालयात दावा

मुंबई : आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला कायदेशीर हक्क मिळतात. २६/११च्या हल्लय़ातील मुख्य आरोपी कसाबलाही कायद्याचा लाभ मिळाला होता. परंतु माझ्यावर गुन्हा दाखल करताना सीबीआयने कायद्याला बगल दिली असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी देशमुख यांच्यावतीने अ‍ॅड्. अमित देसाई यांच्या वतीने युक्तिवाद केला आहे.

देशमुखप्रकरणी वाझेंचा जबाब नोंदवण्यास परवानगी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला परवानगी दिली.