X

मनसेच्या दिपोत्सवाला सचिन तेंडुलकरची हजेरी

शिवाजी पार्कात पार पडला सोहळा

मुंबईसह राज्यभरात दिवाळीच्या उत्साह जोरदार पहायला मिळतोय. राज्यातल्या सर्व बाजारपेठा या ग्राहकांनी अक्षरशः फुलून गेल्या आहेत. दिवाळीनिमीत्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्क परिसरात दिपोत्सवाचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने सपत्नीक हजेरी लावली होती. यावेळी शिवाजी पार्क परिसरात रोषणाईही करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत 8 ते 10 दरम्यान फटाके फोडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र या आदेशाला हरताळ फासत मनसेने संध्याकाळी सात वाजल्याच्या सुमारास शिवाजी पार्क मैदानात फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी उपस्थितांनी सचिनसोबत फोटो काढण्याची संधी गमावली नाही.

 

 

शिवाजी पार्क परिसरात मनसेने जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. (छाया – अमित चक्रवर्ती)
First Published on: November 4, 2018 8:23 pm
  • Tags: mns, raj-thakrey, sachin-tendulkar,