01 October 2020

News Flash

अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचीही बदली करण्यात आली आहे

मेट्रो ३ च्या माजी व्यवस्थापकिय संचालक अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे. जयश्री बोस यांच्या जागी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रो ३ च्या व्यवस्थापकिय संचालक पदावरुन जानेवारी महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस करोना विषाणू व्यवस्थपानाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमण्यात आलं आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले होते.

अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. डिसेंबर महिन्यात शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरुन मतभेद झाले होते. त्यानंतर त्यांना करोना विषाणू व्यवस्थापन समितीत सहभागी करुन घेण्यात आलं होतं. आता त्यांना मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे.

आज मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांचीही बदली झाली. त्याचपाठोपाठ संजीव जैस्वाल आणि अश्विनी भिडे यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद देण्यात आलं आहे.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 7:45 pm

Web Title: former mumbai metro rail corp md ashwini bhide appointed as additional municipal commissioner bmc scj 81
Next Stories
1 आयुक्तांच्या बदलीवरून भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
2 मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली, इकबाल चहल नवे आयुक्त
3 Video: रुग्णालयाच्या खिडकीमधून उडी मारुन करोनाचा रुग्ण पळाला
Just Now!
X