News Flash

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

पदावरून हटवण्यात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री देखमुख यांच्यावर आरोप केले.

गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

 

पोलिसांना दरमहा १०० कोटी वसूल करण्याचे लक्ष्य : परमबीर सिंह

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी तपासप्रकरणी गृहरक्षक दलात बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शनिवारी गंभीर आरोप केले. गृहमंत्र्यांनी अटकेतील वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटींचे हप्ते वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते, असा आरोप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.

मुंबईतील मद्यालये, पब्ज आणि हुक्का पार्लरचालकांकडून महिन्याला ४०-५० कोटी रुपयांचे हप्ते जमा होऊ शकतात आणि अन्य मार्गांनी उर्ररित रक्कम जमा करता येतील, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या होत्या, असा आरोप सिंह यांनी केला.  मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या. मुंबईतली १७५० मद्यालये, पब, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला दोन ते तीन लाखांचा हप्ता घेतल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमा करता येईल, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी तत्कालिन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहायक आयुक्त संजय पाटील यांना दिल्या होत्या. वाझे यांनी ही बाब त्याच दिवशी आपल्या कानावर घातली, असे सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. गृहमंत्र्यांचा पोलीस कामकाजातला हस्तक्षेपही वाढला होता, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची मोटार सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सुरू केला. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात १७ मार्चला सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले. त्यांची बदली गृहरक्षक दलात करण्यात आली. पदावरून हटवण्यात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री देखमुख यांच्यावर आरोप केले.

देशमुख यांनी ४ मार्च रोजी पोलीस उपायुक्त(अंमलबजावणी) भुजबळ आणि समाजसेवा शाखेचे सहायक आयुक्त संजय पाटील यांना ज्ञानेश्वारीवर बोलावून घेतले. मात्र देशमुख यांच्यावतीने त्यांचे स्वीय सहायक पालांडे यांनी भुजवळ, पाटील यांना हप्ते वसूल करण्याचा तोच ‘हिशोब’ समजावून सांगितला. त्यानंतर सहायक आयुक्त पाटील आणि वाझे यांनी आपापसात चर्चा के ली. ते दोघेही मला भेटण्यासाठी आले. दोघांनी गृहमंत्र्यांच्या मागणीबाबत मला सूचित केले, असा दावा सिंह यांनी पत्रात केला आहे.

दरम्या, सिंह यांनी गृहमंत्र्यांच्या कथित आक्षेपार्ह सूचनांविरोधात तेव्हाच आवाज का उठवला नाही किं वा त्यांचे वागणे, मागण्या पटणाऱ्या नव्हत्या तर त्यांनी पदाचा राजीनामा का दिला नाही? असे प्रश्न समाजमाध्यमांवरून उपस्थित केले जात आहेत.

शरद पवारांनाही पूर्वकल्पना!

मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचा गुंता वाढत असतानाच व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंह यांच्यासह मुंबई पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले होते. या भेटीत आपण गृहमंत्र्यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. देशमुख यांच्या आर्थिक मागण्या, पोलीस कारभारातील वाढता हस्तक्षेप याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली होती. बहुतेक बैठकांना काही मंत्री उपस्थित होते. त्यांना देशमुख यांच्या वर्तनाची पूर्व कल्पना होती, असा दावाही सिंह यांनी

सूड भावनेतून बदली!

अंबानी धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून, पोलीस आयुक्तांकडून गंभीर चूका झाल्या. त्या अक्षम्य आहेत. आयुक्तांची बदली ही प्रशासकीय कारणावरून करण्यात आलेली नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात त्यांची आर्थिक मागणी, पोलीस कारभारातील वाढत्या हस्तक्षेपास विरोध के ल्यानेच देशमुख यांनी सूड भावनेने आपली बदली के ली, असा आरोप सिंह यांनी केला.

‘डेलकर आत्महत्याप्रकरणात दबाव’

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त के ल्याचा गुन्हा मुंबईत नोंदवा, असा हट्ट गृहमंत्री देशमुख यांनी धरला होता. मात्र ते व्यवहार्य नाही, असे मत मी मांडले. डेलकर यांनी आत्महत्या मुंबईत के ली असली तरी त्यांना हे टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करणारे प्रसंग दादरा-नगर हवेली येथे घडले आहेत. हद्दीच्या वादाबरोबर येणाऱ्या अडचणींबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत के ल्यानंतरच मी माझे मत मांडले होते. मात्र ते अव्हेरून देशमुख यांनी विधानसभेत विशेष तपास पथकाची घोषणा के ली, असा आरोपही सिंह यांनी केला.

 

भाजपचा आंदोलनाचा इशारा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला नाही अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली नाही तर भाजप कार्यकर्ते रविवारी संपूर्ण राज्यभर आंदोलन करतील आणि सरकारला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडतील. हे आंदोलन देशमुख यांची हकालपट्टी होईपर्यंत चालूच राहील, असा इशारा असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. देशमुख यांचा राजीनामा घेऊन सरकारने साडेअकरा कोटी जनतेची माफी मागायला हवी, असे पाटील म्हणाले.

पत्रात काय?

’काही महिन्यांपासून देशमुख मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाचे (सीआययु) प्रमुख सचिन वाझे यांना सतत आपल्या शासकीय निवासस्थानी बोलावून घेत होते.

’देशमुख यांनी वाझे यांना हप्ते गोळा करण्याच्या सूचना केल्या होत्या. फे ब्रुवारीत ज्ञानेश्वारी या निवासस्थानी वाझेंशी झालेल्या भेटीत देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे ‘लक्ष्य’ वाझे यांना दिले होते.

’मुंबईत १७५० बार, हुक्का पार्लर, पब्ज असून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन ते तीन लाखांचे हप्ते वसूल केल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमवता येईल, असे देशमुख यांनी वाझेंना सांगितले.

गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा : फडणवीस

नागपूर : मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांचे पत्र धक्कादायक आणि गंभीर असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सरकारने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतरही त्यांनी केवळ सरकार वाचवण्यासाठी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, तर ते राज्याला धोक्यात टाकण्यासारखे ठरेल, असे फडणवीस म्हणाले. हे आरोप एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केले आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास संस्थांमार्फत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 3:19 am

Web Title: former mumbai police commissioner parambir singh home guard in connection with the mukesh ambani threat probe has asked home minister anil deshmukh akp 94
Next Stories
1 रुग्णविस्फोट राज्यात चोवीस तासांत २७,१२६ नवे रुग्ण, देशातही उच्चांक
2 हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे
3 गर्दीच्या ठिकाणी प्रतिजन चाचण्या
Just Now!
X