09 March 2021

News Flash

मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांचे निधन

भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होत.

मुंबईचे माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. Express Photo by Vasant Prabhu. 16.04.2015. Mumbai.

मुंबईचे माजी नगरपाल व ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासामा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुंबईतील चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते.

भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे ते वडील होत. त्यांनी मुंबईचे महापौरपद ही भूषवले होते. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे ते संस्थापक होते. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी फाऊंडेशन, कॉमन मेन्स फोरम अशा निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले आहे. २००५ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. आज सांयकाळी ५.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

 

“Frmer sheriff Nana Chudasama whose book “”History on a Banner’ releases” *** Local Caption *** “Frmer sheriff Nana Chudasama whose book “”History on a Banner’ releases on Thursday. Express Photo by Pradeep Kocharekar, Mumbai, 16/06/2010” Former deputy prime minister L.K Advani holds forth at the launch of Nana Chudasama’s book “history on a banner” in Mumbai on Thursday as industrialist Mukesh Ambani and Chudasama look *** Local Caption *** Former deputy prime minister L.K Advani holds forth at the launch of Nana Chudasama’s book “history on a banner” in Mumbai on Thursday as industrialist Mukesh Ambani and Chudasama look on. Express Photo By Pradip Das .17/06/10 Mumbai.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 2:36 pm

Web Title: former mumbai sheriff nana chudasama passes away at 86
Next Stories
1 गोरेगावमध्ये निर्माणाधीन दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू; 7 जखमी
2 मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
3 शासकीय डॉक्टरांच्या दुकानदारीला चाप!
Just Now!
X