04 March 2021

News Flash

अभियांत्रिकी कौशल्यापलीकडे शहर व्यवस्थापन हवे

आज ‘नैना’मध्ये शहर नियोजन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

विद्याधर फाटक (माजी नियोजक, एमएमआरडीए)

पायाभूत सुविधांचे दोन भाग असतात. एक म्हणजे राष्ट्रीय स्तरावरच्या पायाभूत सुविधा. त्यात महामार्ग, विमानतळ इत्यादींचा समावेश असतो. दुसरा भाग म्हणजे महानगरातल्या पायाभूत सुविधा. आपल्या देशातले ६० ते ७० टक्के ‘सकल वार्षिक उत्पन्न’ हे शहरी भागांतून येते. त्यातही महानगरांचा वाटा मोठा असतो. मुंबई, पुणे, नागपूर यांप्रमाणेच नाशिक, औरंगाबाद, जळगाव इत्यादी शहरेसुद्धा येत्या वीस वर्षांमध्ये महानगरे होण्याची शक्यता आहे. त्यांची वाढ आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांच्यात एक आभासी चक्र राहण्याची आवश्यकता असते. आर्थिक वाढीसाठी सुलभ जीवनशैली आवश्यक आहे. आर्थिक वाढीतून पायाभूत सुविधांकरिता पैसा कसा उभा करता येईल याचाही विचार करणे आवश्यक आहे. महानगरांमध्ये दाट लोकवस्ती असल्याने रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिन्या इत्यादी सुविधा रस्त्यांवरच असतात. त्यासाठी फक्त अभियांत्रिकी कौशल्य महत्त्वाचे नाही, तर दोन्ही प्रकारच्या पायाभूत सुविधांचा एकमेकांशी संबंध लक्षात घेतला पाहिजे.

पूर्वी शहर नियोजनातून प्रकल्प उभे राहात होते. आता प्रकल्प आधी उभे राहात आहेत आणि त्यादृष्टीने नियोजन करावे लागत आहे. आज ‘नैना’मध्ये शहर नियोजन योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याचा फायदा आपल्याला शहरांचा विस्तार करण्यासाठी होणार आहे. आज बऱ्याच शहरांमध्ये जुन्या वस्त्यांच्या पुनर्विकासाची आवश्यकता आहे. उदा. नागपूरमधले महाल असेल किंवा नाशिकमधला सरकारवाडय़ाच्या जवळचा परिसर, मुंबईतील डोंगरी, उमरखाडी परिसर इत्यादी. शहरांचा विस्तार, त्यासाठी पायाभूत सुविधा आणि त्यासाठी जमीन मिळवणे याचे पुरावे आधारित नियोजन आवश्यक आहे. ‘ऑर्डर विदाऊट डिझाइन – हाऊ मार्केट्स शेप सिटीज’ असे एक पुस्तक अलीकडेच लिहिण्यात आले. ही मार्केट्स कसे परिचालित होतात हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि जोपर्यंत आपण ते विदा विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्या नियोजनात आणत नाही, तोपर्यंत शहराच्या समस्या कायम राहणार आहेत. पण याचा हळूहळू उपयोग होऊ  शकेल. पुढच्या वीस वर्षांमध्ये आपण चांगल्या तऱ्हेने नियोजन करू शकू.

शब्दांकन : नमिता धुरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 4:36 am

Web Title: former planner mmrda vidyadhar phatak advantage maharashtra event zws 70
Next Stories
1 ‘कमळा’वर निवडणूक लढण्याचा विचार -आठवले
2 जुने विक्री करार मागितल्याने पुनर्विकास रखडणार
3 मुंबई, पुण्यात सीसीटीव्हीमुळे ११०० हून अधिक गुन्ह्य़ांची उकल
Just Now!
X