पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेचे  माजी अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग यांना न्यायालयाने ९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीएमसी बँकेत ४ हजार ३५५ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी वरियमसिंग यांना शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. माहीम चर्च परिसरातून त्यांना ताब्यात घेतले होते. रविवारी वरियमसिंग यांना  न्यायालयात हजर करण्यात आले असता ९ ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर पीएमसी बँकेतील गैरव्यवहार समोर आले होते. हाऊसिंग डेव्हल्पमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) कंपनीला अवैधरीत्या कर्ज वाटप केल्यामुळे बँकेवर निर्बंध लादण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.

याप्रकरणी कथितरीत्या कर्ज वाटप केल्याप्रकरणी माजी संचालक जॉय थॉमस यांना शुक्रवारी अटक केली होती. त्याचबरोबर एचडीआयएल ग्रुपचे राकेश वधवान आणि सारंग वधवान यांनाही अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे.