News Flash

‘हुतात्मा चौका’चे नाव आता ‘हुतात्मा स्मारक चौक’

मनसेच्या दिलीप मांडे यांनी केली होती मागणी

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर आता मुंबईतील एका महत्त्वाच्या ठिकाणचं नावदेखिल बदलण्यात आलं आहे. फोर्ट परिसरातील हुतात्मा चौकाच्या नावात बदल करण्यात आलाय. ‘हुतात्मा चौक’ हे नाव बदलून आता ‘हुतात्मा स्मारक चौक’ असे नामकरण करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) मुंबई महापालिकेतील गटनेते दिलीप लांडे यांनी हुतात्मा चौकाच्या नावात बदल करावा अशी सूचना महापालिका सभागृहात मांडली होती. ही सूचना सभागृहात सर्वानुमते मंजूर झाल्याने मनसेच्या मागणीला यश आलं आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोड या रेल्वे स्टेशनचं नाव लवकरच बदलणार असल्याचे जाहीर कऱण्यात आले होते. या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. एलफिन्स्टन रोडऐवजी ‘प्रभादेवी’ तर छत्रपती शिवाजी टर्मिनसऐवजी आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं नामकरण होणार आहे.

मुंबईतील हा ऐतिहासिक चौक असून याआधी त्याचे नाव फ्लोरा फाऊंटन असे होते. ब्रिटीश काळात बांधल्या गेलेल्या फ्लोरा फाऊंटनच्या जवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांचे स्मारक आहे. त्यामुळे याला हुतात्मा चौक असे नाव पडले होते. कारंजे आणि दादाभाई नौरोजी यांचा पुतळा ही ऐतिहासिक स्मारके या चौकात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 6:41 pm

Web Title: fort hutatma chauk name will be change
Next Stories
1 Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; मुलुंडजवळ लोकलमध्ये बिघाड
2 ‘ते’ तरुण दहा वर्षांपासून आयएसआयच्या संपर्कात
3 औरंगाबाद राज्य कर्करोग संस्थेला केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा!
Just Now!
X