|| प्रसाद रावकर

फिटझ्गेराल्ड कारंज्याची डागडुजी; ऑक्टोबरनंतर मुंबईकरांना दर्शन

Tiger from sanctuary missing after collar falls off Nagpur
‘कॉलर’ गळून पडल्याने अभयारण्यातील वाघीण ‘बेपत्ता’
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
use molds 40 years ago on manufacturers for sugar gathi Pune
साखर गाठीसाठी नवे साचे मिळेनात; उत्पादकांवर ४० वर्षांपूर्वीचे साचे वापरण्याची वेळ
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

मुंबई : तब्बल ६० वर्षांपूर्वी हटविण्यात आलेला ब्रिटिशकालीन ४० फूट उंच फिटझ्गेराल्ड कारंजा पुन्हा दक्षिण मुंबईमधील मेट्रो चौकात उभारण्याच्या हालचालींना गती आली आहे. धूळ खात पडलेल्या या कारंजाने आता कात टाकली असून येत्या ऑक्टोबरमध्ये तो मेट्रो चित्रपटगृहासमोरील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत चौकाची (मेट्रो चौक) शोभा वाढवणार आहे.

ब्रिटिशांनी मुंबईमध्ये अनेक दिमाखदार वास्तू उभ्या केल्या. तसेच मुंबईच्या वैभवात वाढ करण्यासाठी काही शिल्पे, कारंजे आदी उभे केले. त्यापैकीच एक म्हणजे धोबीतलाव (आताचा मेट्रो चौक) येथे उभारण्यात आलेला फिटझ्गेराल्ड कारंजा. मुंबईमध्ये १८६७ ते १८७२ या काळात सेमूर फिटझ्गेराल्ड गव्हर्नर होते. त्यांच्या स्मरणार्थ १८६७ मध्ये हा ४० फूट उंच आणि १९ फूट रुंद कारंजा उभारण्यात आला. ओतीव लोखंडाच्या या कारंजावरील नक्षीकाम आणि दिव्यांमुळे तो आकर्षण बनला होता. मेट्रो चौकाच्या मधोमध असलेला हा कारंजा वाहतुकीस अडथळा बनू लागला आणि १९६०च्या सुमारास तो हटविण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान मुंबईतून ब्रिटिशकालीन खुणा हटविण्यात आल्या. त्या वेळी हा कारंजाही हलविण्यात आल्याचे बोलले जाते.

काळपरत्वे मेट्रो चौकातील परिस्थिती बदलली. तेथे काही वाहतूक बेटे उभी राहिली आहेत. त्यामुळे आता मध्यभागी हा कारंजा उभारणे अडचणीचे बनले आहे. परिणामी, या चौकातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अर्धपुतळ्यासमोरील

वाहतूक बेटावर हा कारंजा उभारण्यात येईल.

गेली ६० वर्षे अडगळीत पडलेला हा कारंजा आणि त्यावरील दिव्याची डागडुजी करण्यात आली आहे. नक्षीदार खांबाची डागडुजी, तुटलेल्या व जीर्ण झालेल्या भागांची दुरुस्ती, कारंजाची जलव्यवस्था आदी कामे पूर्ण झाली आहेत. धूळ खात पडलेल्या या कारंजाला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आहे. लवकरच हा खांब मेट्रो चौकातील नियोजित स्थळी आणण्यात येणार असून त्यावर अंतिम हात फिरविण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यातील कामे ऑक्टोबरमध्ये पूर्ण होतील आणि या कारंजाचे दर्शन मुंबईकरांना घडेल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

इंग्लंडमध्ये पाऊलखुणा

इंग्लंडमधील कारंजाप्रमाणेच फिटझ्गेराल्ड यांच्या स्मरणार्थ हाबनविले कारंजा तयार करण्यात आला होता. नॉर्थहेम्प्टन येथील बारवेल अ‍ॅण्ड कंपनीच्या ईगल फाउंड्रीमध्ये ओतीव लोखंडापासून हा कारंजा तयार करण्यात आला होता. जगभरात केवळ असे दोनच कारंजे होते. त्यापैकी इंग्लडमध्ये एक आणि दुसरा मुंबईत. इंग्लंडमधील कारंजा काळाच्या कालौघात काढून टाकण्यात आला. मात्र मुंबईमधील फिटझ्गेराल्ड कारंजा पुन्हा बसविण्यात येत असल्याचे समजताच इंग्लंडमधील संबंधित वास्तुशास्त्रज्ञांची उत्सुकता बळावली होती. मुंबईत दाखल होऊन त्यांनी या कारंजाची पाहणी केली होती, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.