News Flash

सात वर्षांच्या मुलीस कोंडून ठेवल्याप्रकरणी चौघांना अटक

जुन्या अंबरनाथ गावातील गायकवाड पाडय़ातील एका गाळ्यात एका सात वर्षांच्या मुलीस कोंडून ठेवल्याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे.

| February 14, 2013 04:24 am

जुन्या अंबरनाथ गावातील गायकवाड पाडय़ातील एका गाळ्यात एका सात वर्षांच्या मुलीस कोंडून ठेवल्याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली असून एक जण फरार आहे.
मंगळवारी संध्याकाळी खेळायला गेलेली मुलगी घरी आली नाही. घरच्यांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळे अखेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत रात्रीच तो सर्व परिसर पिंजून काढला असता अब्दुल रहमान याच्या गाळ्यात ती मुलगी सापडली. याप्रकरणी सोमीन शेख, मोमीन शेख, मोहम्मद शेख आणि मोहम्मद फैजल या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या अपहरण प्रकरणातील आणखी एक आरोपी अनायत खुपरे मात्र फरार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:24 am

Web Title: four arrested on seven years girl confine matter
टॅग : Arrested
Next Stories
1 मलनि:सारण वाहिनी साफ करणाऱ्या तीन कामगारांना वायुबाधा
2 दोन तरुणांची नवी मुंबईत आत्महत्या
3 भाजप प्रदेशाध्यक्ष १६ फेब्रुवारीला ठरणार
Just Now!
X