गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत कुरिअर सव्‍‌र्हिस कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून २ कोटी ८८ लाख रुपये किमतीचे दागिने लुटणाऱ्या चार आरोपींना मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी दहा लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. मुंबईबाहेरून येणाऱ्या दागिन्यांचे पार्सल शहरातील विविध जवाहिऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम काळबादेवी येथील एअर कुरिअर सíव्हस कंपनी करते. या कंपनीचा कर्मचारी महेंद्रकुमार सनी (२३) विमानतळावर चेन्नईहून आलेले पार्सल घेण्यासाठी गेला होता. पार्सलमध्ये २ कोटी ८८ लाख रुपये किमतीचे दागिने होते. त्यावेळी पाच जणांनी त्याला थांबविले. गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून दहिसर युनिट कार्यालयात चौकशीसाठी येण्यास सांगितले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवत सैनीला जोगेश्वरी उड्डाणपुलाजवळ उतरवून ते पसार झाले.