25 January 2021

News Flash

क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण कार अपघातात चार जणांचा मृत्यू

अन्य चार जखमींवर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

फोटो सौजन्य - ANI

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात एका भरधाव कारनं आठ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा  मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगात असलेल्या या गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  समीर डिग्गी असे या कार चालकाचे नाव असून त्यालाही दुखापत झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिग्गीवर तीन महिन्यांपूर्वीही जे.जे.मार्ग पोलिसांनी  भरधाव वेगात कार चालवून अपघातात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

मुंबईतील क्रॉफड मार्केट परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. गाडीचे नियंत्रण सुटल्यावर गाडी क्रॉफड मार्केट परिसरातील जनता कॅफेला धडकली. अपघातानंतर जखमींना तातडीने जे. जे रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये गाडीच्या चालकाचा देखील समावेश आहे. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून यात तीन महिलांचा समावेश आहे. अन्य गंभीर जखमींवर जे.जे रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 1:18 am

Web Title: four people were killed in a horrific car accident near crawford market abn 97
Next Stories
1 सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षांबाबतच्या निकालाचा राज्य सरकारकडून अवमान?
2 चाचण्या वाढविताच रुग्णसंख्येत वाढ
3 टाटा ट्रस्टकडून चार सरकारी रुग्णालये करोना केंद्रात परिवर्तित
Just Now!
X