News Flash

शाळाबस कर्मचाऱ्याचा चिमुकलीवर बलात्कार

बदलापूर येथील डॉन बॉस्को शाळेतील एका चार वर्षांच्या मुलीवर शाळेच्या बसच्या क्लिनरनेच बलात्कार

| September 15, 2013 01:02 am

बदलापूर येथील डॉन बॉस्को शाळेतील एका चार वर्षांच्या मुलीवर शाळेच्या बसच्या क्लिनरनेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संदीप किरवे (२६) या नराधमाला अटक केली आहे. मागील आठवडय़ात हा प्रकार घडला.
डॉन बॉस्को शाळेतली ही चिमुरडी ६ सप्टेंबरला शाळेच्याच बसने घरी परतत होती. परतीच्या प्रवासात तिचे घर शेवटी असल्याने बसमध्ये ती एकटीच होती. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत संदीपने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलगी पालकांबरोबर ठाण्याला नातेवाइकांकडे गेली होती. तिथे मुलीला त्रास होऊ लागला. त्यामुळे पालकांनी तिला वैद्यकीय तज्ज्ञांकडे नेले. तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता वरील प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल करताच आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:02 am

Web Title: four year old girl raped on moving school bus in mumbai
Next Stories
1 ‘मैत्री..’चा अखंड झरा
2 हार्बर रेल्वसेवा विस्कळीत
3 सात सेकंदाची चित्रफित, सात पथके आणि चौदा तास
Just Now!
X