22 October 2020

News Flash

रास्तभाव दुकानांमार्फत गरिबांना चणा डाळीचे मोफत वितरण 

शासन मान्य रास्त भाव दुकानांमार्फत प्रति महिना एक किलो याप्रमाणे नोव्हेंबपर्यंत चणा डाळीचे वितरण करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना शासन मान्य रास्त भाव दुकानांमार्फत प्रति महिना एक किलो याप्रमाणे नोव्हेंबपर्यंत चणा डाळीचे वितरण करण्यात येणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यासंबंधीचा आदेश जारी केला.

मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.  परिणामी हातावर पोट असलेल्या गरीब-कष्टकरी वर्गापुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्याचा विचार करून केंद्र सरकारने एप्रिल ते जून या कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नोंदीत असलेल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला.

या योजनेत एक किलो अख्खा चणा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र बहुतांश कु टुंबांनी त्याऐवजी चणाडाळ मिळावी, अशी मागणी केली. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही तसे अहवाल राज्य शासनाकडे पाठविले. त्यानुसार राज्य शासनाने आता के ंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रति कु टुंब प्रति महिना एक किलो चणा डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:17 am

Web Title: free distribution of chana dalto the poor through fair price shops abn 97
Next Stories
1 सरकार स्थिर असल्यानेच आदित्य ठाकरे लक्ष्य – परब
2 स्थानिकांना नोकऱ्यांसाठी राज्यात लवकरच कायदा
3 औषधांच्या अतिवापरामुळे अन्य संसर्गाचाही धोका; करोना उपचारांबाबत इशारा
Just Now!
X