वर्षअखेर आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा यांचे अतूट नाते असते. अनेक महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा या काळात घेतल्या जातात. आयआयटी, एमबीए, सीए, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांसह शालान्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांच्या या काळात विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तणावाखाली असतात. विद्यार्थ्यांवरचा हा भार हलका करण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट’च्या (जीईटी) वतीने मोफत अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘एमटी एज्युकेअर’च्या वतीने रोबोमेट प्लस हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून त्यात तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेले लेक्चर्स विद्यार्थ्यांना पाहता येतील.
गेल्या वर्षीपासूनच ‘ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट’ने ‘एमटी एज्युके अर’च्या सहकार्याने हे ‘रोबोमॅट’चे व्हिडीओ पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसह अनेकांना मोफत उपलब्ध करून दिले होते. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना त्याचा विशेष फायदा झाला. ‘रोबोमॅट प्लस’ अ‍ॅप हे त्याच दिशेने उचललेले पुढचे पाऊल आहे. या अ‍ॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चर्स पाहून आपल्या अभ्यासाचा सराव करता येणे शक्य होईल. विद्यार्थी त्यांच्या वेळेप्रमाणे आणि घरच्या घरी हे शिक्षण घेऊ शकतील. हे अ‍ॅप ‘गुगल’वर https://goo.gl/pDSI9K या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेता येईल.