09 August 2020

News Flash

पालिकेची रुग्ण शोध मोहीम ; घरोघरी जाऊन ४० लाख व्यक्तींची तपासणी करणार

पालिकेने मुंबईत कुष्ठरोग, क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. त्या

(संग्रहित छायाचित्र)

क्षय, कुष्ठरोग, असंसर्गजन्य रोगांबाबत प्राथमिक तपासणी

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईमध्ये संयुक्त कुष्ठरोग शोध आणि सक्रिय क्षयरोग शोध आणि असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ सप्टेबर ते ९ ऑक्टोबर या काळात मुंबईतील झोपडपट्टय़ा आणि त्यासदृश परिसरातील तब्बल ४० लाख नागरिकांची कुष्ठरोग, क्षयरोग यांसह उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग या असंसर्गजन्य रोगांबाबत प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. संशयित रुग्ण आढळल्यास पुढील तपासणीसाठी त्यांना पालिकेच्या दवाखान्यात पाठवण्यात येणार आहे.

पालिकेने मुंबईत कुष्ठरोग, क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुष्ठरोग, क्षयरोग शोध आणि जागरूकता अभियान हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश असलेल्या तब्बल दोन हजार ७०५ पथकांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टय़ा आणि त्यासदृश वस्त्यांमध्ये जाऊन ही पथके तब्बल ४० लाख व्यक्तींची तपासणी करणार आहे. तपासणी दरम्यान कुष्ठरोग वा क्षयरोग रुग्ण आढळल्यास त्याला उपचारासाठी पालिकेच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. दवाखान्यात कुष्ठरोग, क्षयरोग वा असंसर्गजन्य रोगांचे निदान करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधितांवर त्वरित औषधोपचार करण्यात येतील, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.

कुष्ठरोग आणि क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी आरोग्य विभागाचे पथक जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे.

मोहिमेची उद्दीष्टे

कुष्ठरोग

*  समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करणे

*  संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी संशयीत रुग्णांचा शोध घेणे.

*  नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर १० लाख लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी करणे

*  समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे व कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे

क्षयरोग

*  निदानाअभावी औषधोपचारापासून वंचित क्षयरुग्णांचा शोध घेऊन औषधोपचार करणे

* क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध घेणे

*  संशयित क्षयरुग्णांच्या आवश्यक तपासण्या करून क्षयरोगाचे निदान करणे व औषधोपचार सुरू करणे

*  समाजात क्षयरोगाविषयी जनजागृती करणे

असंसर्गजन्य रोग

*  असंसर्गजन्य रोगांबद्दल जनजागृती करणे

*  वय वर्षे ३० व

अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग

(मुख, गर्भाशय व स्तन) या रोगांबाबत सर्वेक्षण करणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2019 2:57 am

Web Title: free health check up over 40 lakh people in mumbai on 150th birth anniversary of mahatma gandh zws 70
Next Stories
1 याचिकेत खोटी माहिती देणे महागात
2 मध्य रेल्वेत प्रथमच बॉम्बशोधक पथक
3 झाडांबरोबरच, जैवविविधता परिणामांवरही युक्तिवाद करा!
Just Now!
X