रस्त्यांवरील खड्डय़ांचा निषेध करण्यासाठी चालकांना आयोडेक्स वाटण्याचा अनोखा उपक्रम ‘द वॉचडॉग’ ही संस्था राबविणार आहे. संस्थेचे कार्यकर्ते १५ ऑगस्ट रोजी अंधेरी कुर्ला मार्ग आणि मरोळ मरोशी चौकात सकाळी ११ वाजता हे वाटप करणार आहेत.एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशात नागरिकांना रस्त्यांसारखी पायाभूत सेवाही नीट दिली जात नाही, हे यातून बिंबवले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे शहरात टिकाऊ रस्ते बांधले जात नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात खराब रस्त्यांचा त्रास सहन करावा लागतो, याच्या निषेधात रस्त्यावरून गाडी घेऊन जाणाऱ्या चालकांना आयोडेक्सच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात येईल.