रुग्णांना मोफत सेवा

राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. ‘फिरते वैद्यकीय उपचार केंद्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा १० फिरत्या वैद्यकीय वाहनांचे शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यातील पाच फिरती वैद्यकीय वाहने मुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये मोफत सेवा देणार आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या आरोग्य विकासासाठी मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

आज सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दवाखान्यांचाही राज्यातील झोपडपट्टय़ांमध्ये तसेच आदिवासी, दुर्गम भागात राहणारम्य़ा गोरगरीब नागरीकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर वृद्धांना प्रथमोपचार देणे तसेच त्यांचे समुपदेशन करण्यासाठी राज्यात लवकरच सायकल अँम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आयोग्यमंत्री सावंत यांनी दिली.

शहरांमधील दाट लोकवस्ती असणाऱ्या भागांमध्ये तसेच ग्रामीण दुर्मग भागामध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत हे फिरते दवाखाने चालविण्यात येणार आहेत. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात१० फिरते दवाखाने कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबईसाठी पाच तसेच नागपूर, नांदेड, औरंगाबाद, नवी मुंबई, पनवेल आणि कोल्हापूर या शहरांमध्ये एक फिरता दवाखाना कार्यरत असेल.

या फिरत्या दवाखान्यात डॉक्टर,नर्स, लॅब तज्ञ,फार्मासिस्ट आदी असतील.या फिरत्या दवाखान्यांमध्ये रक्त लघवी तपासणी, उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार, संदर्भसेवा, कुटुंबनियोजन, प्रसूतीपूर्व व प्रसुतीपश्चत माता व बालसंगोपन, लसीकरण, साथीचे रोग नियंत्रणात्मक कार्यRम, समुपदेशन, राष्ट्रीय आरोग्य कार्यRमाची अंमलबजावणी, आरोग्य व परिसर स्वच्छता याबाबत लोकजागृती इत्यादी सेवा पुरविण्यात येणार आहेत. या फिरत्या दवाखान्यातील सर्व सेवा मोफत असतील.