27 May 2020

News Flash

करोनाग्रस्तांसाठी एक हजार रुग्णालयांत मोफत उपचार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत एप्रिलपासून सुरुवात

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या १ एप्रिलपासून राज्यातील एक हजार रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे रुग्ण परराज्यातील असला तरी त्याच्यावरही विनामूल्य उपचार केले जाणार आहेत.

करोनाबाधित रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला असला तरी १ एप्रिलपासून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक हजार रुग्णालयात त्याची अंमलबजावणी होणार आहे. आरोग्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत यापूर्वी केवळ ४९२ रुग्णालयांचाच समावेश होता व ९७१ आजारांवर उपचार करण्यात येत होते. यातील अनेक आजारांसाठी रुग्ण उपचार घेत नसल्याचे लक्षात घेऊन यातून १५० प्रकारच्या आजारांना वगळण्यात आले असून नव्याने २०० आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात गुडघ्यावरील शस्त्रक्रिया, हिप रिप्लेसमेंट तसेच डायलिसिस आदी अत्यावश्यक व खर्चिक उपचारांचा समावेश केल्याचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. यासाठी अलीकडेच निविदा काढण्यात आली होती.

परराज्यातील अनेक कामगार महाराष्ट्रात काम करत असतात हे लक्षात घेऊन अन्य राज्यातील रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. करोनाची लागण अन्य रुग्णांना होऊ शकते हे लक्षात घेऊन सध्याच्या परिस्थितीत काही विशिष्ठ रुग्णालयातच करोनाग्रस्तांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे डॉ शिंदे यांनी सांगितले.

*  राज्यातील सव्वा दोन कोटी कुटुंबाना या विमा कवचाचा फायदा मिळणार आहे.

*  करोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

*  मोफत उपचाराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना शिधावाटप पत्रिका आणि स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र द्यावे लागेल.

*  रुग्णाकडे शिधावाटप पत्रिका नसेल तरीही अपवादात्मक परिस्थितीत त्याला उपचारांचा लाभ मिळू शकतो अशी तरतूदही या योजनेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2020 12:47 am

Web Title: free treatment at a thousand hospitals for corona patient abn 97
Next Stories
1 ‘कुणी उपाशी झोपणार नाही, याची काळजी घ्या’
2 अन् पोलिसांमुळे त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला..
3 ‘घरून काम’ खर्चिक  आणि व्यत्यय आणणारे
Just Now!
X