02 March 2021

News Flash

दिवाळी अंक जगभरात उपलब्ध होणार, फ्रेंड्स लायब्ररीचा उपक्रम

१० वर्षे पुर्ण केल्यानिमित्त नवीन उपक्रम

फ्रेंड्स लायब्ररी

डोंबिवलीतील फ्रेंड्स लायब्ररीने ऑनलाईन व्यवसायाची दहा वर्षे पूर्ण करत अकराव्या वर्षात पाऊल टाकले आहे. दहा वर्षापूर्वी जेव्हा इंटरनेट वापरणे म्हणजे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं त्यावेळेस लायब्ररीसारखा व्यवसाय ऑनलाइन माध्यमातून करण्याचा धाडसी निर्णय पुंडलिक पै यांनी घेतला होता.

फ्रेंड्स लायब्ररीमार्फत www.friendslibrary.in या वेबसाईटच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथे पुस्तकांची सोय पुरवली जाते. विशेष म्हणजे वाचकांना घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील ही एक आगळीवेगळी लायब्ररी आहे. स्वत:चे मोबाईल अॅप्लिकेशन असलेली फ्रेंड्स ही एकमेव लायब्ररी आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून वाचकांना पुस्तकांची ऑर्डर देत येते. वेबसाईटवरून अवघ्या काही मिनिटांमध्ये वाचकांना पुस्तकं मागवता येत असल्याने तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटामध्ये फ्रेंड्स लायब्ररी लोकप्रिय झाली आहे.

१० वर्षे पुर्ण केल्यानिमित्त नवीन उपक्रम लायब्ररीने हाती घेतला आहे. दिवाळी अंक जगभरात कुठेही उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुंडलिक पै यांनी यावर्षी घेतला आहे. आतापर्यंत फराळ परदेशात जायचा आता फ्रेंड्स लायब्ररी च्या माध्यमातून दिवाळी अंक परदेशात जाणार असे पै यांनी सांगितले.

येत्या २ वर्षात घरपोच सेवा देणारी लायब्ररी महाराष्ट्रभर चालू करणार असल्याचा निर्धार पै यांनी केला आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे फ्रेंड्स ऑनलाइनला वाचक फोनसुद्धा पुस्तक ऑर्डर करू शकतात. त्याचबरोबर वेबसाईटवर नवीन पुस्तकांची माहिती मिळते. लायब्ररीमध्ये २.५ लाखाहून अधिक पुस्तके आहेत. तसेच दरवर्षी १५० हुन अधिक दिवाळी अंक लायब्ररी मध्ये वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येतात. मागणी असलेल्या विशेष दिवाळी अंकांच्या २०० हून अधिक प्रती लायब्ररी विकत घेत असल्याने एकाच वेळी अनेकांना दिवाळी अंकाचा अस्वाद घेता येतो. त्याचप्रमाणे दिवाळी अंक घरपोच देणारी ही राज्यातील एकमेव लायब्ररी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 7:12 pm

Web Title: friends library completes 10 years
Next Stories
1 दिवाळीच्या तोंडावर बिल्डरांचा ग्राहकांसाठी ऑफर्सचा ‘धमाका’
2 वांद्र्यातील झोपडपट्टीत भीषण आग, ५० झोपड्या खाक
3 संपात सहभागी न झालेल्या ओला चालकाला बेदम मारहाण आणि उठाबशांची शिक्षा 
Just Now!
X