26 August 2019

News Flash

मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या मित्र परिवाराकडून जल्लोष

रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून आणि एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी आनंद व्यक्त केला.

मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर त्यांच्या मित्र परिवाराने जल्लोष केला.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवल्याने संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, मुंबईतील कुलभूषण यांच्या मित्रपरिवारानेही कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष केला. रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून आणि एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी आनंद व्यक्त केला.

पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज मोठा दिलासा दिला. कोर्टाचा निकाल भारताच्या बाजूने लागला असून कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. १५-१ च्या फरकाने हा निकाल लागला आहे.

First Published on July 17, 2019 7:37 pm

Web Title: friends of kulbhushan jadhav celebrate after icj rules in favour of india aau 85