बोरिवलीच्या शिंपोली रोडवरील मेघा ज्वेलर्स हे दुकान लुटणाऱ्या दोघांना बोरिवली पोलीस ठाण्याने अटक केली आहे.
निशीत जैन यांच्या दुकानात २४ जून रोजी बाजूच्या दुकानातून भगदाड पाडून चोरांनी प्रवेश करून दुकानातील ६० लाखांचे दागिने चोरले होते. या आरोपींनी तीन महिन्यांपूर्वी या दुकानाच्या बाजूचा गाळा भाडय़ाने घेऊन आंबेविक्रीचा धंदा सुरू केला होता.
हर्षद नायक या इसमाने या आरोपींना संदीप गोसालिया आणि मनोहर दोशी या दलालांच्या माध्यमातून भाडय़ाने दिला होता.गाळा भाडय़ाने देताना त्यांनी करारपत्र केले नव्हते. तसेच पोलिसांनाही कळविण्यात आले नव्हते.
कॉटनग्रीन येथेही अशीच चोरी
कॉटनग्रीन एच. बी. सोळंकी यांच्या सोन्या-चांदीच्या दुकानाला भगदाड पाडून  ८० लाख रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. सोळंकी यांच्या शेजारी असलेल्या गाळ्यात पाच जण गेल्या तीन महिन्यांपासून आंबे विकण्याचा व्यवसाय करत होते. मंगळवारी दुकानदाराने आपले दुकान उघडले तेव्हा हा प्रकार कळून आला. काळाचौकी पोलीस पुढील तपास करत आहेत.