वसंत देसाई फाऊंडेशन फॉर क्रिएटिव्ह सिनर्जी या संस्थेतर्फे येत्या १३ मार्च रोजी मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतात आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे संगीतकार वसंत देसाई यांच्यावरील ‘वसंत देसाई एक अनुभव’ या दृकश्राव्य संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पु. ल. देशपांडे कला अकादमीचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन विकास देसाई यांचे आहे. या संगीतमय सोहळ्यात वसंत देसाई यांचा जीवनपट आणि त्यांचे संगीतातील योगदान उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमात तुषार दळवी, सुमित राघवन, रवींद्र साठे, वैशाली सामंत, रतन मोहन शर्मा, त्यागराज खाडिलकर, कीर्ती शिलेदार, सचिन पिळगावकर आणि अन्य कलाकार सहभागी होणार आहेत.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर
tigmanshu-dhulia-vivek-agnihotri
“असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका

कार्यक्रमात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली ४० मराठी आणि हिंदूी गाणी सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमासाठी रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत मिळू शकतील.