डिजिटलायजेशनच्या युगात प्रत्येकजण ऑनलाईन शॉपिंग, बँक पेमेंट, हॉटेल- ट्रेन बुकिंग आणि सराकरी कामांना मागे टाकत ऑनलाईन अंत्यसंस्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईजवळील पालघर येथे ऑनलाईन अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे.

पालघरमधील ६५ वर्षीय महिलेचे अंत्यसंस्कार गुजरातमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मुलीने ऑनलाईन व्हिडीओ कॉलद्वारे केल्याचे समोर आले आहे. ऐवढेच नाही तर आपल्या आईच्या अस्थी कुरियरने गुजरातला मागवल्या आहेत. सोशल मीडियामध्ये सध्या हा विषय चर्चेचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये धीरज पटेल (७०) आणि निरीबाई पटेल(६५) हे दाप्मत्या राहत होतं. यांच्या एकुलत्याएक मुलीचे लग्न गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालं. पटेल दाम्पत्यांची मुलगी पती आणि दोन मुलांसोबत अहमदाबादमध्ये राहत आहे. मंगळवारी धीरज पटेल कामानिमित्त बाहेर गेले होते तेव्हा त्यांच्या पत्नीचे अकाली निधन झाले. घरी कोणी नसल्यामुळे शेजरील लोक जमा झाले. शेजाऱ्यांनी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मुलीला फोन करून आईचे निधन झाल्याचे सांगितले. त्यावर मुलीने आपण येऊ शकत नसल्याचे सांगितले. फोनवर मुलीने शेजाऱ्यांना अंत्यसंस्कार करा आणि मला व्हिडीओ कॉलद्वारे दर्शन द्या असे सांगितले. शेजाऱ्यांनी निरीबाईंचे अंत्यसंस्कार केले आणि मुलीला व्हिडीओ कॉलवर दर्शन दिले. मिळालेल्या माहितीनुसार, यानंतर त्यामुलीने फोनर शेजाऱ्याला आईच्या अस्थी कुरियरने गुजरातला पाठवायला सांगितल्या.

पटेल दाम्पत्य पारशी असल्याने मनोरमध्ये पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सुविधा नाही. त्यामुळे गावातील हिंदू-मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारशी असलेल्या निरीबाई यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.