23 July 2019

News Flash

सीएसएमटी पूल दुर्घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच-आदित्य ठाकरे

पूल दुर्घटनेला जबाबदार असलेल्या कोणालाही माफी नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे

आदित्य ठाकरे

सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पूल पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर तीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या प्रकरणी महापालिकेने चार जणांवर कारवाई केली आहे. असं असलं तरीही याप्रकरणी जे आणखीही कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भातले एक ट्विटच त्यांनी केले आहे.

पूल दुर्घटनेसाठी जे दोषी असतील त्यांना माफी मिळणार नाही, जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी हे ट्विट केलं आहे.

First Published on March 15, 2019 8:19 pm

Web Title: furthermore as a matter of transparency the bmc has made the entire file of the audit report made then and action taken on it based on the input open to public scrutiny