मुंबई: सध्याच्या आर्थिक संकटकाळात जिथे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत किंवा पगार कपात करत आहेत. अशात फ्युचर जनराली इन्शुरन्स कंपनीने मात्र सर्व कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नती, वार्षिक पगारवाढ आणि विविध आर्थिक लाभांची घोषणा केली आहे. एवढंच नाही तर कंपनीने एकाही कर्मचाऱ्याला कामावरुन काढलं जाणार नाही असंही आश्वासन कंपनीने दिलं आहे. कंपनीने आपल्या बिझनेस अॅक्टिव्ह एजंट आि त्यांच्या कुटुंबीयांची कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यास तातडीचा मदतनिधी म्हणून प्रत्येकी ५० हजारांची तरतूदही केली आहे.
भारतात सध्याच्या घडीला फ्युचर जनराली इन्शुरन्स कंपनीच्या १२५ पेक्षा जास्त शाखा आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्यात कोणतीही तडजोड न करणे असे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. टाळेबंदीच्या काळात विविध पातळ्यांवर कार्यरत असणारे ७० हून अधिक कर्मचारी सहभागिता, मुलाखती घेणे, नियुक्ती करणे तसेच प्रेरणा देण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांच्या सोबतीने काम करत आहेत. मागील वर्षांप्रमाणेच यंदाही कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवली जाणार आहे असंही कंपनीने स्पष्ट केलंय.
फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ अनुप राऊत म्हणले की “एखादी कंपनी कर्मचारीकेंद्री असल्याशिवाय ग्राहककेंद्री होऊ शकत नाही. त्यांच्यातील परस्पर संबंधांवर आमचा विश्वास आहे. आधीपेक्षा आजच्या घडीला आमचा कर्मचारी वर्ग आणि सहकारी यांच्या आयुष्यात निश्चितता आणि स्थैर्य हवे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक तरतुदी करण्यात येत आहेत.”
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 4:41 pm