23 January 2020

News Flash

दुसऱ्या यादीत ‘कटऑफ’मध्ये एका टक्क्याची घट

नामांकित महाविद्यालयांत प्रवेशाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा

नामांकित महाविद्यालयांत प्रवेशाची स्वप्ने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अकरावी प्रवेशोत्सुक अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दुसऱ्या फेरीत अनेक नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांत (कट ऑफ) सरासरी केवळ १ ते २ टक्कय़ांची घट झाली आहे.

अकरावीची दुसरी प्रवेश यादी सोमवारी दुपारी जाहीर झाली. पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीतही नामांकित महाविद्यालयांच्या प्रवेश यादीवर केंद्रीय शिक्षण मंडळ (सीबीएसई), आयसीएसई आणि इतर मंडळांचा वरचष्मा दिसत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट होऊनही दुसऱ्या फेरीतही नामांकित महाविद्यालयांचे कट ऑफ गुण हे ८५ ते ९० टक्कय़ांच्या दरम्यान आहेत. काही महाविद्यालयांत जेमतेम एका टक्कय़ाने कट ऑफ घसरला आहे. प्रत्येक फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नव्याने देण्याची मुभा असल्यामुळे काही महाविद्यालयांचे कट ऑफ हे पहिल्या फेरीपेक्षाही वाढले आहेत.   दुसऱ्या प्रवेशफेरीमध्ये द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील विद्यार्थ्यांत चुरस झाल्यामुळे या महाविद्यालयांचे कटऑफ साधारण १० ते १२ गुणांनी खाली आले आहेत. या फेरीसाठी १ लाख ३३ हजार २४५ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी आलेल्या १ लाख ७ हजार ७८५ अर्जातील ६९ हजार १७० विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. १६,३३७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.

पुढील प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

  • मिळालेल्या महाविद्यालयात मंगळवारपासून (२३ जुलै) गुरुवारी (२५ जुलै) दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश घेता येईल
  • पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल
  • २ ते १० पैकी पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत सहभागी होता येईल
  • पुढील फेरीसाठी महाविद्यालयाचे पसंतीक्रम बदलता येतील
  • २७ ते २९ जुलै या कालावधीत तिसऱ्या फेरीसाठी महाविद्यालयाचे पसंतीक्रम देता येतील.

First Published on July 23, 2019 3:07 am

Web Title: fyjc online admission 2019 mpg 94
Next Stories
1 यंत्रणेतले ‘शेखचिल्ली’
2 मालेगाव बॉम्बस्फोट खटला कधीपर्यंत संपणार?
3 वांद्रे येथे ‘एमटीएनएल’ इमारतीला आग
Just Now!
X