26 February 2021

News Flash

रुपयाच्या ‘झोकांडी’ने ‘उत्सव खरेदी’ कलंडली

श्रावण महिना सरायला लागला की, अनेक मंडळींना एकामागोमाग येणाऱ्या उत्सवांचे वेध लागतात. यात उत्सवप्रेमी मंडळींप्रमाणेच खरेदीप्रेमी मंडळींचाही समावेश असतो.

| September 11, 2013 01:50 am

श्रावण महिना सरायला लागला की, अनेक मंडळींना एकामागोमाग येणाऱ्या उत्सवांचे वेध लागतात. यात उत्सवप्रेमी मंडळींप्रमाणेच खरेदीप्रेमी मंडळींचाही समावेश असतो. उत्सवाच्या आनंदात भर टाकणाऱ्या विविध सवलती, ‘एक घ्या, दुसरे मोफत’सारख्या आकर्षक योजना यांमुळे या खरेदीप्रेमी मंडळींच्या उत्साहाला भरते आलेले असते. मात्र यंदा या खरेदीप्रेमी मंडळींना केवळ उत्सवाच्या आनंदावरच समाधान मानावे लागेल, अशी परिस्थिती बाजारात आहे. रुपयाच्या घसरगुंडीचा परिणाम बाजारावर दिसत असून एरवी या दिवसांत विविध योजनांसह गिऱ्हाइकांना खेचून घेणारी दुकाने यंदा काहीशी सुनीसुनी आहेत.
गुढीपाडव्यानंतर श्रावणसरी बरसायला लागेपर्यंतचा मधला काळ हा बाजारपेठेसाठी फारसा उत्साहवर्धक नसतो. एखाद्या महिन्यात घाऊक लग्नाचे मुहूर्त आले, तरच बाजारपेठेत धामधुम असते. एरवी एअर कंडिशनर, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही अशा मोठय़ा वस्तूंपासून ते इस्त्री, मायक्रोव्हेवसारख्या छोटय़ा वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टींची खरेदी उत्सव काळापर्यंत पुढे ढकलली जाते. याचे एकमेव कारण म्हणजे गणपती, नवरात्री, दसरा, दिवाळी अशा एकामागून एक येणाऱ्या उत्सवादरम्यान जाहीर होणाऱ्या सवलती आणि आकर्षक योजना!
यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला ‘स्टॉक क्लियरिंग’च्या योजना जाहीर झाल्या. मात्र मुसळधार आषाढझडींच्या साक्षीने रुपयाही कोसळायला सुरुवात झाली. पावसाने श्रावणात थोडीशी विश्रांती घेतली, पण रुपयाची घसरण सुरूच राहिली. त्यामुळे आयात केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग व्हायला सुरुवात झाली. परिणामी यंदा गणेशोत्सव सुरू होऊनही मोठमोठय़ा दुकानांनी आपल्या योजना किंवा सवलती यांच्या जाहिराती अजूनही सुरू केलेल्या नाहीत.
सध्याची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर घसरत्या रुपयाचा परिणाम अद्याप तरी झालेला नाही, असे ‘विजय सेल्स’चे मालक निलेश गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर, ‘शॉपर्स स्टॉप’मध्ये आता दिवाळीच्या सुमारास सवलत वगैरे असेल. गणेशोत्सवात आमच्याकडे कोणतीही सवलत योजना नसते, असे ‘शॉपर्स स्टॉप’च्या गोविंद श्रीखंडे यांनी सांगितले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सवलती जाहीर करण्याचा मार्ग गेल्या काही वर्षांपासून रूढ झाला आहे. ‘क्रोमा’नेही यंदा देशभर सवलत योजना जाहीर केली होती. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता दिवाळी, दसरा या सणांसाठी आम्ही तयारी करत आहोत. त्यामुळे गणपतीच्या दिवसांत अशी सवलत किंवा योजना जाहीर झालेली नाही. ग्राहकांसाठी योजना जाहीर करताना ‘क्रोमा’ आर्थिक सवलतीबरोबरच ‘अदलाबदल योजना’ (एक्स्चेंज ऑफर) अशा गोष्टींची चाचपणी करत आहे. जूनी वस्तू देऊन त्याबदल्यात नवी वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी ‘क्रोमा’ विचार करत आहे, असे इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक अजित जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

‘त्या’ फायलींसाठी मुख्यमंत्र्यांवर नाराजी?
खास प्रतिनिधी, मुंबई
दोन-तीन महिने फाइली रखडण्यामागे सरकारच्या हाताला लकवा लागला की काय, अशी शंका व्यक्त करीत पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यामागे ‘विशिष्ट’ फाईली रखडल्याचे कारण असल्याची चर्चा आहे. पवार यांनी अनेकदा काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पण हाताला लकवा लागल्याची शंका व्यक्त करण्यापर्यंत मजल जावी यातच सारे आले, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. काही विशिष्ट कंपन्यांना मदत करावी म्हणून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला जात आहे. काही विशिष्ट फाईलींचा निपटारा व्हावा म्हणून काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र प्रकरण सरळ नसल्याने मुख्यमंत्र्यांनी ही प्रकरणे मंजूर करण्यास नकार दिल्याचे समजते. राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसमधील काही नेते मुख्यमंत्र्यांवर  नाराज आहेत. त्याचाच संबंध पवार यांच्या विधानाशी जोडला जात आहे.

काही लोकांचा हात सही करताना लकवा लागल्याप्रमाणे थरथरतो! फायलींवर महिनोंमहिने सहीच होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 1:50 am

Web Title: ganesh chaturthi festivities turn economic slowdown
Next Stories
1 ‘यूटय़ूब’ने भारतीय बाजारपेठेत पंख पसरले
2 बीएडलाही विद्यार्थ्यांची वानवा
3 खड्डेमय शीळ – कल्याण रस्त्यावर टोलवसुली सुरूच!
Just Now!
X