News Flash

‘पर्यावरणरक्षक’ कुटुंबांसाठी गणेशोत्सव स्पर्धा

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’चे आयोजन; ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘लोकसत्ता’ यांचा संयुक्त उपक्रम

पर्यावरणाची हानी न होऊ देता उत्सव साजरा करण्याबाबतचे सामाजिक भान वाढत असताना, हेच भान ठेवून आपल्या घरातील गणेशोत्सवही पर्यावरणस्नेही करणाऱ्या कुटुंबांचा सन्मान करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘इकोफ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धे’चे आयोजन केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना रोख पारितोषिके व मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि साहित्याचा वापर करून गणरायाची आरास करणाऱ्या गणेशभक्तांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. ही स्पर्धा मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर विभागात घेण्यात येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोलसारख्या पर्यावरणघातक वस्तूंच्या वापराचे दुष्परिणाम आता सगळ्यांनाच कळू लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाची संकल्पना भाविकांमध्ये रुजत चालली

आहे. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून घरगुती गणेशोत्सव साजरा केला जात आहे. याला अधिक चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ९,९९९ रुपयांचे व द्वितीय ६,६६६ रुपयांचे आहे. तर विशेष पारितोषिक २,००१ रुपयांचे आहे. रोख रकमेबरोबरच विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

कसे सहभागी व्हाल?

* दीड ते अकरा दिवसांचा घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना स्पर्धेत भाग घेता येईल.

* ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये बुधवार, २२ सप्टेंबपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करता येईल. या वेळी आरास करण्याकरिता वापरलेले साहित्य, छायाचित्रे, संपर्क, पत्ता आदी माहिती यावेळी स्वीकारली जाणार आहे.

* छायाचित्र व माहिती टपाल, कुरिअरच्या माध्यमातून loksatta.ecoganesha@gmail.com या ई-मेलवर पाठवता येईल.

* मुदतीनंतर आलेल्या छायाचित्रांचा विचार स्पर्धेसाठी केला जाणार नाही.

* गणेशमूर्ती व सजावट पर्यावरणस्नेही असावी.

* छायाचित्रात गणेशमूर्ती, मखर आणि सजावट स्पष्ट दिसावी. त्यासाठी छायाचित्रे (वेगवेगळ्या कोनातून काढलेली) काढून पाठवायची आहेत.

* मूर्ती व सजावटीची तीन छायाचित्रे पाच बाय सात आकाराची व रंगीत असावी.

* छायाचित्रासोबत स्पर्धकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी, मोबाइल, ई-मेल, वापरलेल्या साहित्याची यादी जोडावी.

* परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

अधिक माहितीसाठी संपर्क

* मुंबई – लोकसत्ता, सातवा मजला, मफतलाल सेंटर, नरिमन पॉइंट, दूरध्वनी- ६७४४०३६९.

*  ठाणे – लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, दूरध्वनी-२५३९९६०७.

*  नाशिक – वंदन चंद्रात्रे, लोकसत्ता ६, स्टेडियम कॉम्प्लेक्स, महात्मा गांधी रोड, भ्रमणध्वनी क्रमांक-९४२२२४५०६५.

*  पुणे – अमोल गाडगीळ, दि इंडियन एक्स्प्रेस प्रा. लि., एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट क्रमांक १२०५/२/६, शिरोळे रोड, शिवाजीनगर, भ्रमणध्वनी ९८८१२५६०८२

*  औरंगाबाद – मुकुंद कानिटकर, १०३ गोमटेश मार्केट, न्यू गुलमंडी रोड, औरंगाबाद- ४३१००१, दूरध्वनी क्रमांक ०२४०/२३४६३०३.

*  अहमदनगर – संतोष बडवे, पहिला मजला, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर-४१४००१, भ्रमणध्वनी-०९९२२४००९८१.

*  नागपूर – गजानन बोबडे, वितरण विभाग,फ्लॉट नं. ३८, ऑडिसन ट्रेड सेंटर, पहिला मजला, डागा लेआऊट, अंबाझरी, नागपूर भ्रमणध्वनी – ९८२२७२८६०३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 4:12 am

Web Title: ganesh utsav tournament for the eco friendly families
Next Stories
1 आनंदाच्या क्षणांचे ‘सेलिब्रेशन’!
2 घरगुती गणपतीच्या सजावटीत कलेचा अनोखा आविष्कार
3 मंडपातील जागरणासाठी तरुणांना ‘वायफाय’चा डोस!
Just Now!
X